Tuesday 19 April 2011

गेले काही दिवस भ्रष्टाचार हा शब्द खूपच बोलला गेला, आणि अण्णांच्या आंदोलनानंतर त्याला एक वेगळाच दृष्टीकोन मिळाला म्हणूनच आज इथे लिहावास वाटल. आपल्या प्रत्येकाला खरतर भ्रष्टाचार नको आहे पण तो दुसऱ्याचा. आपल आणि भ्रष्टाचारच नात  किती खोलवर आहे बघुयात, सुरवात  होते ते ती ज्यांच्या नावाने आपण सगळे खडे फोडतो अश्या नेते मंडळींची, पण खरच सांगा त्यांना निवडून दिले कुणी, मग काही लोक असे म्हणतात कि चांगले लोकच  उभे राहत नाही, पण खरच राहत नाहीत का? जे राहतात त्यांना किती लोक मते देतात? मग काही लोकांच अस  म्हणन असत कि आम्ही पुष्कळ देऊ पण पैसे घेऊन मते देणारी लोक याला जबाबदार आहेत? मग पैसे न घेणाऱ्यांची संख्या वाढवता येणार नाही का? माझ्या माहितीच्या एका माणसाला मी निवडणुकीच्या दिवशी विचारला "केल का मतदान?" त्यावर त्याच उत्तर होता या देशाच्या पडझडीत मला सहभागी व्हायचं नाही, याला आपण काय म्हणणार? 
  1. आपण निवडणुकीच्या दिवशी बाहेर गावी जातो का? 
  2. मते देताना जात, धर्म, लिंग पैसा याला महत्वाच स्थान देतो का?
  3. देव दर्शनाच्या वेळी आपण पैसे देऊन पुढे जाण्याच प्रयन्त करतो का?
  4. traffic मध्ये नियम मोडून मांडवली करतो का?
  5. परीक्षेत कॉपी करतो का?
  6. प्रवास तिकीट न काढता करतो का?
  7. ऑफिस मध्ये जास्तीत जास्त कामचुकारपणा करतो का?
  8. काम करून घेण्यासाठी पैशाचे लालूच दाखवतो का?
  9. मुलांचे ऐडमिशन पैसे देऊन करतो का?
  10. वीज चोरी करतो का?
मग आपण भ्रष्टाचारीच आहोत. आणि हे आंदोलन आपल्या सगल्यान्विरूढ आहे.
तुम्हाला काय वाटत?